कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 23 :- कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेलं आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना त्यांची उणीव सतत जाणवेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र देवळेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शिवसेना या आमच्या सहयोगी पक्षाचे कल्याण-डोंबिवली शहरातील नेते, नगरसेवक असलेले राजेंद्र देवळेकर लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. गेल्या काही वर्षात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असून या दु:खातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना व सहकारी कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.