जसवंत सिंह जागतिक दर्जाचे मुत्सद्दी व राजनीतिज्ञ

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जसवंत सिंह यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. प्रखर देशभक्त, अभ्यासू व प्रभावी वक्ते असलेल्या जसवंत सिंह यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ व परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांची संसदेतील व संसदेबाहेरील अभ्यासपूर्ण भाषणे व वक्तव्ये आवर्जून ऐकली जात. श्री. जसवंत सिंह यांचेशी माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक जागतिक दर्जाचा मुत्सद्दी व राजनीतिज्ञ गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांचे चिरंजीव मानवेंद्र सिंह व इतर परिवारजनांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.