आठवडा विशेष टीम―मुंबई,दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ संरक्षण दलातील संधी’ या विषयावर संरक्षण विषयाचे अभ्यासक डॉ. नरेंद्र विसपुते यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि.२९ सप्टेंबर व बुधवार दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल.निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत सैन्यदलात जाण्यासाठी कशी तयारी करावी, एनडीए प्रवेश प्रक्रिया, भूदल, वायुदल व नौदल यामधील संधी, महिलांना सैन्यदलात उपलब्ध असलेल्या संधी, शालेय वयामध्ये एनसीसीचे महत्त्व,टेक्निकल पदे व इतर संधी याविषयी सविस्तर माहिती संरक्षण विषयाचे अभ्यासक डॉ. नरेंद्र विसपुते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.