महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विधानभवनात अभिवादन

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.