राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम― नवी दिल्ली, २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.