राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २ : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज 116 वी जयंती आहे. त्यानिमित्त राज्यपालांनी शास्त्रींच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

governor

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.