अंबाजोगाई पंचायत समिती आणि शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणच्या संयुक्त विद्यमाने एज्युकेशनल वेबिनार सिरीज-2020 चे आयोजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शिक्षकांमध्ये अध्यापन,अध्ययन या बाबत आधुनिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी सध्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याकडे कल आहे. हाच धागा पकडुन पंचायत समिती अंबाजोगाई आणि शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने एज्युकेशनल वेबिनार सिरीज-2020 चे आयोजन दि.4 ऑक्टोबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन रविवार,दि.4 ऑक्टोबर रोजी करण्यात येत आहे. अशी माहिती अंबाजोगाई पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक-मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले आहे.

एज्युकेशनल वेबिनार सिरीज 2020 अंतर्गत रविवार,दि. 4 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.बच्चूभाऊ उर्फ ओमप्रकाश कडू हे या वेबिनार सिरीजला शुभेच्छा संदेश देऊन उद्घाटन करतील तर अजित कुंभार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड) हे मार्गदर्शन करणार आहेत.पहिल्या वेबिनार मध्ये अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी हे “गणिताचं कोड सोडवताना” या विषयावर मार्गदर्शन करतील.तसेच दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी डॉ.नितीन चाटे हे ‘कोरोना पर्यावरण आणि आपण‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी अधिव्याख्याता डॉ.योगेश सुरवसे (लातूर) हे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आपण‘ या विषयावर मार्गदर्शन करतील,दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी विषय सहाय्यक संदिप वाकचौरे (संगमनेर) हे ‘भाषेच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करताना‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी वाचन चळवळीचे प्रणेते अभिजीत जोंधळे हे ‘पुस्तक काही सांगु इच्छितात‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी विषय सहाय्यक श्रीधर नागरगोजे अंबाजोगाई हे ‘इंग्रजी भाषा आणि माध्यम‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 15 नोव्हेंबर 2020 रोजी प्राचार्य म.रा.शै.सं.प्र. प.विकास गरड (पुणे) हे ‘परिणाम कारक अध्यापनाची गुरूकिल्ली दिक्षा अ‍ॅप‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 22 नोव्हेंर 2020 रोजी आधिव्याख्याता इमाम मिर्झा (लातूर) हे ‘कल चाचणी‘ आणि व्यवसाय मार्गदर्शन‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सहशिक्षक श्रीनिवास मोरे हे ‘शिकतं करण्यासाठी 72 उपक्रम‘ या विषयावर आपले अनुभव व्यक्त करतील आणि दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी मुख्याध्यापक उत्तरेश्‍वर मिटकरी (साकुड) हे ‘चित्रकलेतून शैक्षणिक साहित्य निर्मिती‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.हे सर्व विषय शिक्षकांचा व्यक्तीमत्व विकास तसेच आधुनिक जगाशी शिक्षकांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.संपुर्ण राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी अंबाजोगाई पंचायत समिती पहिलीच असल्यामुळे या उपक्रमाचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार,बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी विशेष कौतुक केले आहे.या उपक्रमात अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत-जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंबाजोगाई पंचायत समितीचे सभापती श्रीमती विजयमाला शेषेराव जगताप,उपसभापती श्रीमती पटेल अलीशान समीर,सर्व पंचायत समिती सदस्य,गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणसीकर,गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी आणि शिक्षक-मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय रापतवार तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.