परळी:अशोक देवकते― परळी तालुक्यातील परळी – बीड रोडवर सिरसाळा हे गाव रोड शेजारी आहे. आज एका खदानीत सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली आहे. याबाबत अधिक माहिती सिरसाळा पोलिस स्टेशन कडून मिळाली आहे. सविस्तर माहिती अशी की कृष्णा वाघमारे राहणार सिरसाळा यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी सिरसाळा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती त्या फिर्यादीत म्हटले की त्यांचा मुलगा चंद्रकांत वाघमारे यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून घेऊन गेल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम, ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आज दि. ९ रोजी दुपारी सिरसाला परिसरात रोड शेजारी असलेल्या एका खदानीत लहान मुलाचा प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले संबंधित मुलाची ओळख त्याच्या पालकांना पटल्यानंतर कृष्णा वाघमारे या मुलाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी सुरू ठेवणार असल्याचे सिरसाळा पोलिस स्टेशन कडुन सांगण्यात आले आहे.