प्रशासकीयब्रेकिंग न्युज

माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

आठवडा विशेष टीम―मुंबई दि. १० : पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळे नाते होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.