पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाण मध्यम प्रकल्प येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न 

आठवडा विशेष टीम― बीड,दि, 10 :नागापूर तालुका परळी वैजनाथ येथील वाण मध्यम प्रकल्प येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. सदस्य अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, मोहनराव सोळंके, भैय्या धर्माधिकारी, उपसभापती श्री. मुंडे, दीपक देशमुख, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ कार्यकारी अभियंता आर.ए. सलगरकर, तहसीलदार विपिन पाटील, न. पा. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी परिसरातील पदाधिकारी, अधिकारी नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.