परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार – पालकमंत्री धनंजय मुंडे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

बीड, दि, 10:अशोक देवकते― परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार असून परळी शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी येणाऱ्या काळात विविध आवास योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकूल बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

परळी नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचे धनादेश वाटप पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

Photo 2

या कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, परळी न.पा.च्या नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष सकिल कुरेशी, वाल्मिक कराड, बाजीराव धर्माधिकारी, दिपक देशमुख, न.पा.मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न शासनाच्या विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार असून तसेच परळी शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत परळी शहरात साडेपाच हजार घरकुले बांधून देण्याचा प्रकल्प येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहे. तसेच नगर परिषद परळी वैजनाथ अंतर्गत सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकूल बांधण्याकरिता दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर असून लाभार्थ्यांची एकूण संख्या 1357 झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांस दोन लाख पन्नास हजार अनुदान मंजूर असून लाभार्थ्यांना शासन निर्देशाप्रमाणे काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता 40 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे असे सांगून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी पथविक्रेत्यासांठी सुक्ष्म पतपुरवठा योजने अंतर्गत 668 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 640 अर्जास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 33 लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Photo 8

परळी शहराच्या विकासाबरोबरच नागरिकांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून शहरात येणाऱ्या काळात सुर्याच्या प्रकाशावर चालणारा सोलार प्रकल्प उभारण्यात येणार असून यामुळे रोजगार उपलब्ध होणार असून यामुळे परळी शहराच्या विकासात व अर्थकाराणात भर पडणार आहे.

परळी शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून या योजनेचे उद्घाटन लवरकच करण्यात येणार असून यामूळे शहराला 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. नगर पालिकेच्या वतीने शहरामध्ये नालीमुक्त नगरपालिका राबविण्यात येत असून या योजनेमुळे नागरिकांना होणारे आजार कमी होण्यास मदत होईल तसेच येणाऱ्या काळात परळी शहरामध्ये सर्वात मोठे नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परळी शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांची जबाबदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. याकामात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वांनी सरक्षित अंतर ठेवून व योग्य ती काळजी घेवून येणाऱ्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी आमदार संजय दौंड म्हणाले की, पालकमंत्र्याच्या माध्यमातून जिल्हयासाठी व परळी शहरासाठी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत असून यामुळे जिल्हयाच्या विकासात भर पडत आहे व गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावर म्हणाले की, परळी शहरातील नागरिकांसाठी नगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणात योजना राबवित आहे. शहरातील गरजू लाभार्थ्यांना स्वत:चे घर मिळाले पाहिजे यासाठी नगर परिषद प्रयत्न करत असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यामुळे गरजू लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी धनादेश वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत शांतीवन स्मशानभूमी भिमनगर येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

या कार्यक्रमास, नगर परिषदेचे सभापती, उपसभापती नगरपालिका सदस्य यांच्यासह पदाधिकारी अधिकारी-कर्मचारी, लाभार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.