‘हार्वर्ड’अधिष्ठातापदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १० : मूळ भारतीय असलेले विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी आहे. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर व प्रयोगशील प्राध्यापक असलेल्या श्रीकांत दातार यांनी व्यवस्थापकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं मानवी मूल्ये रुजवण्यावर भर दिला. औद्योगिक व्यवस्थापन जगतात वांशिक समानता आणण्याचा प्रयत्न केला. मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वामुळे हार्वर्ड बिझनेस स्कूलची प्रतिष्ठा अधिक वाढेल. त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.