औरंगाबाद जिल्हारस्ते अपघातसोयगाव तालुका

सोयगाव: सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर बनोटी जवळ दुचाकीचा अपघात ,२ जण ठार

सोयगाव/औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव- चाळीसगाव राज्य मार्ग क्रमांक २४ रस्त्यावर बनोटी (ता.सोयगाव) गावापासून एका किलोमीटर अंतरावरील वळणावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
शेवरी (ता. चाळीसगाव) येथील चंद्रकात बद्री फणशे (वय३५) पत्नी अरुणा चंद्रकात फणशे (वय ३०)आणि मुलगा कार्तिक चंद्रकांत फणशे (वय ०५)तिघे जण हिरोहोंडा फॅशन प्रो गाडी क्रमांक एमएच १९एएस ०६४७ ने बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होत तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (वय ४०)आणि संदीप चंपालाल चौधरी (वय३२) बजाज सीटी गाडी क्रमांक एमएच १९ एके ०७०१ दोघे जण नागद कडे वैयक्तिक कामासाठी जात असतांना बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर दोन्हीही दुचाकी समासमोर येवुन जोरात धडकल्याने दुचाकीवरील तीन जण हवेत उडुन आडव्या पडलेल्या दुचाकीवर मरणासन्न अवस्थेत पडले तर दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघातात दुचाकींचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतातील शेतकरी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाल्याने काही काळ वहातूक खोळबुन वहानांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे तसेच बनोटी येथील युवक मदतीला धावून येत पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमउपचार करीत पाचोरा (जि जळगाव) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता बनोटी येथील बेचाळीस वर्षीय बन्सी हरचंद चौधरी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच वर्षीय कार्तिकची तब्बेत खालावल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तिघांची तब्बेत चिंताजनक असुन पाचोरा येथील दवाखान्यात उपचार चालू अाहेत. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढ

    राज्य रस्ता क्रं.२४ सोयगाव चाळीसगाव रस्त्याच्या दुर्तफा वाढलेले गवत आणि झुडपांमुळे तसेच अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर समोरुन येणार्‍या वहानांचा अंदाज येत नसल्याने वहाने समोरासमोर धडकण्याच्या घटनेत वाढ झालेली असुन नुकतेच बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.