ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

धनगर समाज सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा लढणार?

बैठकीत निर्णय―किशोर वरक यांच्या नावाला पसंती

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग):लोकसभा निवडणूकीत धनगर समाजाकडुन आपला उमेदवार उभा करण्यात येणार आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.या प्रक्रियेला रासपचे जिल्हाध्यक्ष किशोर यांनी दुजोरा दिला आहे.

धनगर आरक्षण,आरक्षित समाजाचे आरक्षण टिकवणे व समस्या सोडविणे, राज्यघटना बचाव, दलित, मुस्लिमानवरील अत्याचार,सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या आदी मुद्दे घेऊन धनगर समाज लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे.

या बैठकीत सक्षम उमेदवार म्हणून रासप जिल्हाध्यक्ष किशोर वरक यांना अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजाचे २ लाखावर मतदार आहेत. इतर समाजाची साथ मिळाल्यास फायदा होवू शकतो व समाजातील लोकांची इच्छा व साथ असल्यास अपक्ष म्हणून निवडणूकीत उतरण्यास सहमती दर्शवली आहे.मात्र याविषयी लवकरच दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.