प्रशासकीयब्रेकिंग न्युज

वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस शिपाई रजनी जबारे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.१८: कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे, सृजनाचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा उत्सव साजरा करत असताना मला पोलीस दलातील महिला पोलिसांच्या कार्याचे आवर्जून कौतुक करावे वाटते असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

    मुंबई पोलीस दलातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई रजनी जबारे यांनी घरामध्ये बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीला चिंचोळ्या खिडकीतून आत प्रवेश करुन बाहेर काढले. जबारे यांच्या कार्यतत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या जबारे यांच्या प्रेरणादायी कार्याचा मला अभिमान वाटतो, असेही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.