सोयगाव:आठवडा विशेष टीम― अतिवृष्टीच्या पंचनाम्यांमध्ये शासनाने घेतलेला आखडता हात आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना न मिळणारे अतिअल्प उत्पन्न प्रमाणपत्र आणि विधवा महिलांना वेतनासाठी होणारी धावपळ यासाठी सोयगावला लाक्षणिक उपोषण घेण्याचा निर्णय रविवारी झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बनोटी ता.सोयगाव येथील बैठकीत घेतला आहे.
बनोटी ता.सोयगाव येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र संपर्कप्रमुख संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबासाहेब कांबळे यांच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मराठवाडा उपाध्यक्ष गुलाब शेख यांनी लाक्षणिक उपोषणाबाबत मार्गदर्शन करून पदाधिकाऱ्यांनी उपोषणासाठी हजर राहण्याचे आवाहन केले.यावेळी बैठकीला संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू जाधव,जिल्हा संघटक आप्पा वाघ,महिला तालुकाउपाध्यक्ष मीराबाई रावूत,आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार बाळु शिंदे यांची औरंगाबाद जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांना नियुकीपत्र वितरण करण्यात आले. बैठकीसाठी दिलीप पद्मे,चंदनसिंग शिंदे,सतीश पाटील,नागराज पाटील,दीपक जयराम,भालेराव,कल्पना शिंदे,सुमनबाई शिंदे,नीलाबाई सोनवणे,सरस्वताबाई रावूत,अंजना मुळे,आकाश पाटील,लताबाई निकम,आदींची उपस्थिती होती.