आठवडा विशेष टीम―
यात मनुष्यहानी झाल्यामुळे अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई सोनवा यांना पाच लक्ष रुपये, मनुष्य जखमीमुळे कारेगाव बंडल येथील लक्ष्मीबाई पेंदोर यांना 1 लक्ष 25 हजार रुपये, पशुधनहानी झाल्यामुळे अंधारवाडी येथील भीमराव दंडाचे यांना 15 हजार, विनोद मरसकोल्हे यांना 12 हजार, लिंगा मेश्राम यांना 6750 आणि रेखाबाई मेश्राम यांना सहा हजारांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, मानव – वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यावर आपला भर असून तशा सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच जंगल परिसरात कुरण विकास करणे, चराई क्षेत्र वाढविणे आदींसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वनखात्याला सहकार्य करणे ही नागरिकांचीसुध्दा जबाबदारी असून वनांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी यावेळी जि.प. अध्यक्ष कालिंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पांढरकवड्याचे उपवनसंरक्षक किरण जगताप, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, जि.प.सदस्य गजानन बेझंकीवार, आसोलीच्या सरपंचा निर्मला धुर्वे, उपसरपंच हरीहर लिंगनवार, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.