प्रशासकीयब्रेकिंग न्युज

उल्हासनगर येथील साई गुरुमुखदास चौक बांधकामासंदर्भात समन्वयातून निर्णय घ्यावा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २१ : उल्हासनगर येथील साई गुरूमुखदास साहेब चौकाच्या उल्हासनगर महानगर पालिकेमार्फत प्रस्तावित बांधकाम व सुशोभिकरणाबाबत पालकमंत्री आणि महापौर यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घ्यावा. यासंदर्भात समन्वयातून निर्णय होणे उचित ठरेल, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत दिल्या.

यावेळी नगरसेविका जया साधवानी, जेसा मोटवानी, ओमी साई, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी, नगरविकास विभागाचे उपसचिव शं.नां जाधव, नगररचनाकार अण्णा गुरगुळे, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस उपायुक्त विनायक नरळे, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगरसेविका जया साधवानी यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार ही बैठक घेण्यात आली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    उल्हासनगर शहरातील रस्ते, चौक व सार्वजनिक जागांचे नामकरण करण्यासंदर्भात याआधी ठराव घेण्यात आला. परंतु याविषया संदर्भात दुमत असल्याने व हा विषय भावनिक असल्याने योग्य निर्णय घेणे गरजे आहे. यासाठी योग्य शाहनिशा करून समन्वयातून निर्णय घ्यावा, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.