प्रशासकीयब्रेकिंग न्युज

योजनांच्या  माहिती व जनजागृतीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 22 : दिव्यांग व्यक्तींमध्ये समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता शरद चव्हाण, उपायुक्त- नागरी हक्क संरक्षण, सुरेंद्र पवार,उपायुक्त- जात प्रमाणपत्र पडताळणी, विजय गायकवाड, सहाय्यक आयुक्त – शासकीय वसतिगृह व अनुदानित वसतिगृह, योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त – रमाई आवास योजना यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/qdXf2wNzxQg या लिंकचा वापर करावा.

  दुपारी 3.00 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता बी जी अरावत सहाय्यक आयुक्त – मिनी ट्रॅक्टर व दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना राधाकिसन देवडे सहाय्यक आयुक्त- जिल्हा परिषद सेस फंड उमेश शहागडकर समाज कल्याण निरीक्षक – भारत सरकार शिष्यवृत्ती परदेश व परराज्य शिष्यवृत्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरच्या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/jHRC1uh0p2M या लिंकचा वापर करावा.

  तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्या यु ट्यूब चॅनलला भेट द्यावी.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.