प्रशासकीयब्रेकिंग न्युज

उस्मानाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना भेटला संवेदनशीलतेचा ‘आदर्श’

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २२ : ‘आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रकमेइतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या रकमेचा डबा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे सोपविला. त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याशी हा संवाद झाला.

आदर्श सौदागर जाधव हा मंगळूर (ता. तुळजापूर) येथील चिमुकला. घरच्यांनी खाऊसाठी दिलेले पैसे त्याने एका डब्यात साठवले होते. हे पैसे त्याने वडील सौदागर जाधव यांच्यासोबत जाऊन उस्मानाबद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे सुपूर्द केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चिमुकल्या आदर्शची आस्थेवाईक विचारपूसही केली. ‘तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रकमेइतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’असे सांगतानाच आपत्कालीन परिस्थितीतही धीराने आणि परस्परांना सहाय्य करण्याच्या चिमुकल्या आदर्शच्या संवेदनशीलतेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुक केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.