अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठान तर्फे नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन गिरवलीकरांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
विमल सेवा प्रतिष्ठान,गिरवली तर्फे विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल रविवार,दिनांक 25 ऑक्टोबर रोजी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नवनाथ घुगे,डॉ.हनुमंत चाफेकर हे मान्यवर लाभले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तूभाऊ आपेट (गुरूजी) हे होते.या कार्यक्रमात नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारे सत्कारमूर्ती चि.अक्षय रामलिंग चौधरी (640/720) व कु.अश्विनी चंद्रकांत आपेट (594/720) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते विमल सेवा प्रतिष्ठानने फेटा बांधून सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व रोख रक्कम देवून गुणगौरव केला. या समारंभामध्ये गिरवली येथील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे रोख मदत केली.ज्यात शिवराज रामभाऊ आपेट यांनी प्रत्येकी पन्नास हजार रूपये मदतीचा धनादेश देवून वैद्यकीय शिक्षण पुर्ण होईपर्यंत दरवर्षी पन्नास हजार रूपये देणार असल्याचे जाहीर केले.तसेच यावेळी संतोष वाघमारे यांचेकडून चि.अक्षय रामलिंग चौधरी याला कै.सोमनाथअप्पा शंकरअप्पा वाघमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाच हजार शंभर रूपये,शेख मौला अजिमोद्दीन यांच्या तर्फे दोन हजार दोनशे बावीस रूपये,धनराज बाजीरावसाहेब बावणे यांच्या तर्फे एक हजार रूपये,जयसिंह देशमुख यांनी दोन हजार रूपये तसेच विमल सेवा प्रतिष्ठान पाच हजार शंभर रूपये या दानशूर व्यक्तींनी पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.प्रस्तावना करताना अध्यक्ष वसंत पतंगे यांनी विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण,पंचक्रोशीतील जनतेची आरोग्य तपासणी शिबीर,ग्राम स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी समाज उपयोगी,विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती दिली.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.नवनाथ घुगे यांनी आपली स्वतःची जडणघडण एका सर्वसामान्य कुटुंबात झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी परस्थितीवर मात करून अभ्यासात सातत्य ठेवावे,कठोर मेहनत करावी.यश हमखास मिळते असे सांगितले.तर डॉ.हनुमंत चाफेकर म्हणाले की,माझीही कौटुंबिक पार्श्वभूमी ही सर्वसामान्यच होती.परंतु,तशाही काळात खचून न जाता.आलेल्या समस्यांचा मुकाबला करीत ध्येय साध्य केले.दोन्ही मान्यवरांनी गुणवंतांचे कौतुक व अभिनंदन केले.सत्कारमूर्ती चि.अक्षय रामलिंग चौधरी व कु.अश्विनी चंद्रकांत आपेट या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना विमल सेवा प्रतिष्ठान व गावक-यांचे आभार मानले.अध्यक्षीय समारोप दत्तूभाऊ आपेट (गुरूजी) यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन आण्णासाहेब आपेट यांनी केले.तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतभाऊ पतंगे यांनी विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींचे आणि उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बळवंत बावणे,सखाराम शिंदे,सामाजिक कार्यकर्ते पवन सोमनाथअप्पा गिरवलकर,अनंत पवार,माधव देशमुख,सर्जेराव सावरे,अरूण आपेट,दत्ता आपेट,
दत्ता उपाडे,रमाकांत आपेट,मधुकर जोगदंड,बाबुराव आपेट,आण्णासाहेब आपेट तसेच पंचक्रोशीतील मान्यवर,नागरीक,महिला हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विमल सेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व गिरवली येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.