आठवडा विशेष टीम―
या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे.
या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोमवार, दि. 7 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन संबंधितांनी करावे, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.