प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जी.डी.आर्ट पदविका प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट पदविका अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4 वर्ष, शिल्पकला व प्रतिमानबंध 4 वर्ष, अंतर्गत गृहसजावट 2 वर्ष, वस्त्रकाम (टेक्सटाईल) (प्रिंटीग अँड विविंग) 2 वर्ष, मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) 2 वर्ष, आणि कला शिक्षणशास्त्र पदविका डिप.ए.एड 1 वर्ष या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होईल.

  विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी तसेच प्रवेश संबंधीच्या पुढील नियोजित तारखा http://cetcell.net/doa/ तसेच www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असे कला संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  ००००

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.