आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘महिलांचे सक्षमीकरण व बालकांचे संरक्षण’ या विषयावर महिला आणि बालविकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार ६ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत कोरोनाकाळात बालसुधारगृहांची घेतलेली काळजी, टाळेबंदीच्या काळात घरातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारविरोधात विभागाने केलेली मदत, कुपोषण निर्मूलनासाठी केलेलं कार्य, कोरोनाकाळात सुरळीतपणे ठेवलेली घरपोच पोषण आहार योजना, प्रतिपालकत्व योजना, राज्यात उभारण्यात येणारी महिला आणि बालविकास भवन, अंगणवाड्यांचा विकास, सीएसआर निधीची मदत अशा विविध मुद्दांवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.