कडा:आठवडा विशेष टीम― माजी आमदार सुरेश आण्णा धस यांच्या प्रयत्नातुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सुलेमान देवळा तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या मार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना राबवली जात आहे तरी त्या योजनेचा पहिला क्लेम शाखा सुलेमान देवळा येथील खातेदार श्री संजय महादेव वामन मयत यांचे वारस पत्नी ललिता संजय वामन यांना मिळाला या योजनेमध्ये आपल्या खात्यामधुन फक्त तिनेशे रुपयाचा हप्ता वार्षिक कपात केला जातो. खातेदार अचानक कुठल्याही कारणाने अपघात अथवा आजाराने अवकाली निधन झाल्यास दोन लाख रूपये विमा सरकार कडुन मिळाला जातो अशिच घटना ऊंदरखेल ता.आष्टी येथील रहीवाशी व सुलेमान देवळा शाखेचे खातेदार श्नी संजय महादेव वामन यांचे अचानक अवकालि निधन झाले.त्यांची प्रधानमंत्री जिवन ज्योति विमा बीड डी.सी.सी शाखेचा विमा हप्ता नियमित भरला. होता.त्यामुळे त्यांना या योजनेतुन दोन लाख रुपयाचा विमा मंजुर झाला. व त्या विमा रकमेचा धनादेश मयताचे वारस पत्नी ललिता संजय वामन त्यांना देताना सुलेमान देवळा शाखेचे रोखपाल एस.एस बोरुडे, शाखाधिकारी आर के लोखंडे, सेवक एस.एम भगत तसेच ऊंदरखेल चे सरपंच अंकुश वामन,नामदेव घोडके सरपंच ,ग्रा.प.सदस्य हरिआओम घोडके,प्रा.दहातोंडे सर,बाबु पठान, ज्ञानदेव वामन,पत्रकार शेख सिराज इत्यादी सह गावातिल ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते.