आठवडा विशेष टीम―
आज विधानभवन येथे नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणा-या करांमध्ये टप्प्यानुसार सवलत मिळण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर, नगरविकासचे प्रणव कर्वे, यासह मेट्रो प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, टीओडी क्षेत्रासाठी टप्प्या-टप्प्याने अधिमूल्य वसुली करण्यासंदर्भात सवलत देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. मेट्रो चे काम हे उद्योग आणि रोजगाराशी संबंधीत आहे. संबंधित काम वेळेत पूर्ण झाल्यास रोजगाराच्या दृष्टीने स्थानिकांना याचा लाभ होईल. याचबरोबर मुद्रांक शुल्काबाबत मार्गदर्शक सुचनांत योग्य ते बदल याबरोबरच खरेदी विक्री करारावरील शुल्कात सवलती देण्यासंदर्भातील निर्णयावर सकारात्मक विचार करण्यात येईल असेही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.