आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.६ : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नागपूर येथील पंधरा मेडिकल दुकानांना अचानक भेट देऊन तपासणी केली. दुकानांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीनुसार मास्कची विक्री होत आहे किंवा कसे याची त्यांनी खातरजमा केली.
शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किंमतीचे बोर्ड दुकांनासमोर लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. काही दुकानांनी त्यांच्या दुकानासमोर इंग्रजी भाषेमध्ये मास्कच्या किंमतीचे बोर्ड लावले होते. तीन-चार दुकानांनी बोर्ड लावले नव्हते. डॉ. शिंगणे सर्व दुकानांसमोर मराठीमध्ये मास्कच्या किंमतीचे बोर्ड लावण्याचे निर्देश दिले. जी मेडिकलची दुकाने उपरोक्त निर्देशाचे पालन करणार नाहीत तसेच जी दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने मास्कची विक्री करताना आढळून येतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ.शिंगणे यांनी दिले आहेत.