आठवडा विशेष टीम―
शिर्डी,दि.७ :- महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर महाराष्ट्राचा हक्क आहे. पाणी वाटपात ज्या पाण्याचा हिशोब धरला नाही, ते अडवून पश्चिम भागातील पाणी येवला, वैजापूरकडे वळवणार असून उपलब्ध पाण्यातून योग्य प्रकारे आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज कोपरगाव येथे केले.
कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे, काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे सुधाकर रोहम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे.देशातून आणि जगातून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत कोरोनाबाबत काळजी नागरिकांनी घ्यावी. दिवाळी आनंदात साजरी करावी मात्र या दिवाळीला जबाबदारीची किनार आहे त्याचा नागरिकांनी आवश्य विचार करावा
कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व लोक अडचणीत आले आहे. अनेकांना स्थलांतर करावे लागले. त्यात अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहे.
कोरोनाचा फटका नागरिकांसोबत शासनाला बसला आहे. नागरिकांकडे मिळणाऱ्या करांमधे कमी आली आहे. त्यामुळे सरकारला कामे करताना अडचणी येत आहेत. शासनाचे नागरिकांना वाचविण्यासाठी प्राधान्य असल्याने आरोग्य, अन्न धान्य आणि पोलीस विभागावर खर्च करण्यात येत आहे.
२५ ते ३० हजार कोटी रुपये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. हे अर्थचक्र आता पुन्हा सुरू होत असून हळूहळू सरकारच्या तिजोरीत पैसे येतील आणि नागरिकांची कामे होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सामान्य नागरिक ज्या प्रमाणे मृत्युमुखी पडले त्याप्रमाणे कोरोनाकाळात आपली जबाबदारी पार पडणारे कर्मचारी डॉक्टर पोलीस मृत्युमुखी पडले. राज्यातील शेवटच्या नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम राज्य शासनाने केले आहे.
आपल्याला पाणी जास्त मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर पडेल त्या पाण्याचा अधिकार महाराष्ट्राचा आहे. मात्र याठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण लढा देत आहोत. गुजरातमध्ये जाणारे हे पाणी गुजरातला लिहून न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविल्यानंतर नाशिक नगर सह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे
कालेश्वरम प्रकल्पाप्रमाणे हे पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल सरकारला कर्ज काढण्याची वेळ आली तरी चालेल मात्र गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न आहे
हे पाणी आल्यांनातर कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. पाण्याचा साठा अधिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला तर प्रांता प्रांतातील वाद संपुष्टात येतील त्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविण्या शिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी आपण आता सोडविण्यास कटिबद्ध असून विकास कामांचा बॅकलॉक भरून काढण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आवर्तन देण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक आमदारांना देण्यात येत असून अभ्यास करून पाण्याचा वापर योग्य रितीने करून आवर्तने देण्यात यावी. कोपरगावच्या हक्काचे पाणी कोणीही नेणार नाही, आरक्षित पाणी पूर्ण क्षमतेने तुम्हाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव मध्ये झाल्याने शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता आले आहे. गोदावरी कालव्याचे पश्चिमेकडील पाणी कोपरगाव पूर्वेकडे वळावे ही अनेक दिवसांची मागणी असून या मागणीचा शासन स्तरावर विचार करण्यात यावा. सध्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बीचे आवर्तन न देता उन्हाळ्यात तीन रोटेशन देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी सुरुवातीला उपलब्ध पाणी व त्याच्या नियोजनाचा आढावा सादर केला.