आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘नाविन्यपूर्ण संकल्पनेतून सर्वांपर्यंत शिक्षण’ या विषयावर शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत कोविडच्या कालावधीत अनलॉककडे जात असताना शिक्षणक्षेत्रात असलेली आव्हाने, राज्यात 8 ते 14 नोव्हेंबर रोजी व्यापक स्वरूपात बालदिवस सप्ताह साजरा केला जाणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती, शैक्षणिक धोरण व त्याची राज्यातील अंमलबजावणी, मातृभाषेतून शिक्षणाची योजना, दहावी व बारावीचे ऑनलाईन वर्ग, दीक्षा ॲप, शाळा व महाविद्यालय सुरू होण्यासंदर्भातील कार्यवाही यासंदर्भात सविस्तर माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.