आठवडा विशेष टीम―
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, इंडियन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, एमटीडीसीचे सरव्यवस्थापक दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. एअर बीएनबीचे व्यवस्थापक अमनप्रित बजाज हे ऑनलाईन सहभागी झाले होते.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, चंद्रकोर बिंदू, वारली कला, संतभूमी अशा विविध घटकांना अर्थपूर्ण रितीने मांडणाऱ्या एमटीडीसीच्या नवीन लोगोमधून महाराष्ट्राची संस्कृती दिसते. कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीचे राज्यातील रिसॉर्टस् आणि विविध उपक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला येत्या काळात चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री कुमार आदिती तटकरे म्हणाल्या की, सध्याच्या काळात पर्यटन विभाग व एमटीडीसी एकत्रितपणे नवनवीन उपक्रम राबवून राज्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायाला चालना देत आहेत. एमटीडीसीचा नवीन लोगो हा राज्याची संस्कृती, शौर्य, निसर्ग संपन्नता दाखवणारा आहे. पर्यटकांना यातून महाराष्ट्रातील पर्यटनाची नवीन ओळख होईल. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातून राज्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
इंडियन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी आणि त्यांच्या टीमने लोगो बनवले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.