प्रशासकीयब्रेकिंग न्युज

दिवंगत इंदिरा गांधी यांना १०३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 19 : दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने राजभवन येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करेन, तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.