आठवडा विशेष टीम―
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
इंदिरा गांधी यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले. परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले. उपसंचालक यांनी उपस्थिताना राष्ट्रीय एकात्मकेची शपथ दिली.