आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सहकाराचे बळकटीकरण’ या विषयावर सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत कोविडच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी कालावधीत सहकार विभागामार्फत घेण्यात आलेले निर्णय, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत मुंबई व पुणे येथे थेट भाजीपाला विक्रीसंदर्भातील निर्णय, आंतरराज्य फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण, कोरोना काळात सहकारी संस्थासाठी घेण्यात आलेले निर्णय, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस व गाळप हंगाम या पिकांच्या हमी भावासंदर्भातील निर्णय, साखर उद्योगासाठी आत्मनिर्भर योजना, कोविड आजार नियंत्रणासाठी सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेले उपक्रम या संदर्भात सविस्तर माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
****