औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

'जंगला' गावाजवळील अपघातात बहुलखेड्याचा एक जण ठार

सोयगाव दि.१६ (ज्ञानेश्वर धोंडू पाटील):भरधाव वेगात असलेली मोटरसायकल झाडावर आदळून एक जन जागिच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सोयगाव-फर्दपुर रस्त्यावर जंगलागावा नजिक वळनावर घडली.
या भीषण अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव मखराम दुबा राठोड.(वय ५५) रा. बहुलखेड़ा ता. सोयगाव असून ते होळीनिमित्त दोन दिवसापासुन जंगला तांडा येथे मुलीला व नातवंडाना भेटन्यासाठी आले होते.
शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्या घरी मोलखेडा येथे दुचाकी क्र.एम.एच.२० सी.एन.५५२३ ने परत जात असतांना सोयगाव- फर्दापूर मार्गावर जंगला धरनाजवळील उतारात दुचाकीचा ताबा सुटून दुचाकी झाडावर आदळली व अपघात झाला.या भयानक अपघातात मखराम राठोड हे जागिच ठार झाले. परीसरातील नागरीकांनी त्याना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलीस ठाण्याचे जमादार सुनील भिवसने व पो.ना.केंदळे दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला या घटनेची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करुन पुढील तपास पोलीस करत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.