आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.