नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विस्तारित रुग्णालय सक्षम –दादाजी भुसे

आठवडा विशेष टीम―

पालघर दि. २५ : वसई व परिसरातील नागरिकांना १८६० पासून हे रुग्णालय सेवा देत असून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार असून हे रुग्णालय आरोग्याच्या कोणत्याही समस्यांशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

यावेळी जि. प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्याक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, माजी महापौर प्रविण शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन. डी तसेच शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कोरोना महासंकटाच्या काळात वैद्यकिय क्षेत्राने उल्लेखनिय काम केले आहे. या इमारतीच्या नूतनीकरण केल्याने 100 खाटांचे रूग्णालय जिल्ह्यासाठी उपयोगाचे ठरणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या जनजागृती नुसार प्रबोधन केलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्याची सिमा गुजरात राज्याला लागून असल्याने जिल्ह्यातील सीमा भागातील प्रवेश द्वारावर दहा टीम तयार करण्यात आल्या आहेत. या दहा टीम च्या माध्यमातून चेक पोस्टवर राज्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. वसई व परिसरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कोरोना योद्धा डॉ. हेमंत पाटील यांना पालकमंत्री श्री. भुसे यांनी श्रध्दांजली वाहिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.