आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘विकासाभिमुख निर्णय’ या विषयावर गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत कोरोना काळात गृह विभागातर्फे करण्यात आलेल्या विविध कारवाया, सध्याच्या काळात राज्याची आर्थिक घडी बसवताना आलेली आव्हाने, कोरोना काळात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केलेले प्रयत्न, महास्वयम पोर्टल तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय याविषयीची सविस्तर माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.