आठवडा विशेष टीम― नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे, यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिक वाचन केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.