अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांचा सन्मान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ,अंबाजोगाई संचालित डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांना नुकतीच वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड ऍडव्हान्स स्टडीज (व्हिस्टास) विद्यापीठ,चेन्नई मार्फत नुकतीच फार्मसी विषयातील सर्वोच्च पी.एच.डी ही पदवी प्राप्त झाली.त्याबद्दल संस्थेचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी गुणगौरव करून श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रा.डॉ.संतोष तरके यांचा सन्मान केला.

प्राचार्य डॉ.संतोष तरके हे सध्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई इथे डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी घेतलेल्या अतिउच्च शिक्षणाचा गौरव बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव संस्थेतर्फे 40,000/- रूपयांचा धनादेश देऊन करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक,पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,भुषण मोदी,सुरेश मोदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद टाकाळकर यांनी केले."फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस" या विषयावरील शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठा कडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्य विषय होता.

डॉ.तरके यांचे संशोधन राष्ट्र उपयोगी ठरेल

===================
प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मूलभूत संशोधन करून "फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस" या विषयावरील आपला शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठाकडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्य विषय होता.हा विषय उपयुक्त असून तो राष्ट्र उपयोगी ठरेल.प्राचार्य डॉ.तरके यांचा अंबाजोगाईकरांना सार्थ अभिमान आहे.श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळासाठी ही भूषणावह बाब आहे.

-राजकिशोर मोदी (संस्थापक सचिव,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ.)


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.