बीड जिल्हा काँग्रेसची दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा काँग्रेसने अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे दु:खद निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अंबाजोगाईतील सहकार भवन येथे गुरूवार,दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,अंबाजोगाई काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,माजी नगरसेवक गणेश मसने,राणा चव्हाण,सचिन जाधव,विजय रापतवार,भारत जोगदंड,अमोल मिसाळ,प्रताप देवकर आदींची उपस्थिती होती.

अहमद पटेल यांनी संपूर्ण जीवन काँग्रेस पक्षाला समर्पित केले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे दु:खद निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाने एक अनुभवी, निष्ठावंत व प्रामाणिक नेता गमावला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (71 वर्षे ) यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 रोजी गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पिरामण गावात झाला होता. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात व्यतीत केली आणि समाजसेवा केली.काँग्रेसला मजबूत करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी ते नेहमी स्मरणात राहतील,त्यांचे संपूर्ण जीवन काँग्रेस पक्षाला समर्पित होते.ते अत्यंत प्रामाणिक समर्पित आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले नेते होते.बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

―राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.