Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई,दि.7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘सर्वांसाठी शुद्ध पाणी’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर या ॲपवरून मंगळवार, दि. 8 डिसेंबर आणि बुधवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे गेल्या एका वर्षातील काम, राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना, गेल्या वर्षभरात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसंदर्भात घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय, स्वच्छाग्रहींच्या माध्यमातून गावपातळीवरील कामे, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे तिथे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी विषयांची माहिती श्री.पाटील यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
0000