अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवारी अभिवादन करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकास महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, दिनांक 6 डिसेंबर रोजी पुष्पहार अर्पण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष प्रशांत चव्हाण,प्रियदर्शनी मस्के,अक्षय शिंदे, अक्षय सरवदे,नरसिंग होरमाळे व अखिल भारतीय मराठा महासंघाचे इतर पदाधिकारी यांची या प्रसंगी उपस्थिती होती.