शेतक-यांच्या समर्थनासाठी विविध पक्ष,संघटना मैदानात
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास लोकचळवळ करण्याच्या हेतूने आणि पुकारलेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाईत विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी एकञ येऊन याबाबत अंबाजोगाई शहरात रविवार आणि सोमवार रोजी सर्वपक्षीय बैठका घेवून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार,दिनांक ८ डिसेंबर रोजी होणा-या भारत बंदला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक आणि मरकज मस्जीद शेजारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विविध पक्षाच्या मान्यवर आणि लोकशाहीच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात लोकशाही मार्गाने सहभाग म्हणून शांततेत व यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांनी किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंद मध्ये अंबाजोगाई शहरातील व्यापारी,शेतमजूर,शेतकरी,कष्टकरी,मजूर वर्ग,तरूण,सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवून शहरातील आस्थापने बंद ठेवून आंदोलनास सहकार्य करावे व देशाचा पोशिंदा असणा-या बळीराजाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन अंबाजोगाईतील कृषि विधेयका विरोधातील सामाजिक संघटना,पक्ष,कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अॅड.इस्माईल गवळी,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे,संविधान रक्षक सेनेचे अॅड.संजय साळवे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाव्हळे,सोमनाथ उदार,प्रहार जनशक्ती पक्षाचे विलास काळुंके,शेतकरी कामगार पक्षाचे भाई वजीर शेख,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख नासेर शब्बीर,प्रहार संघटनेचे शेख फेरोज,एआयएमआयएमचे हिफाजत पठाण,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मोहम्मद ताहेर,इंडियन लॉयर्स असोसिएशनचे अॅड.डी.आर.गोरे,पोलिस मिञ रिजवान खान,भीमसेनेचे अजय गोरे,भीम आर्मीचे प्रशांत आचार्य,भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सुहास वैद्य,राष्ट्रीय किसान मोर्चाचे गणेश वेधे,प्रोटॉनचे डॉ.मोहन मिसाळ,प्रहार दिव्यांग संघटनेचे इब्राहिम गवळी,टिपू सुलतान संघटनेचे प्रा.शेख सादेख,बसव ब्रिगेडचे विनोद पोखरकर,काँग्रेसचे संजय वाघमारे,बसपाचे सतिश पाटेकर,भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रा.सुमीत वाघमारे,मुस्लिम सेवा संघ भारतचे नफील अहेमद शेख,समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.