पाटोदा (शेख महेशर) दि.२०:नुकतेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचार संहिता सुरू झाली आहे. सर्व पक्षाचे नेते व पुढारी वोट बँक कॅश करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने व आश्वासने देण्यात व्यस्त आहेत.अशा परिस्थितीत प्रामुख्याने तरुण मतदारांनी आपल्या मताचे मोल ओळखुन लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा.तसेच मुस्लिम युवकांनी फारसे राजकारणात पडण्यापेक्षा शिक्षण व नोकरी, व्यवसाय निवडून आपले कुटुंब चालवण्यासाठी जबाबदारीने वागावे असे आव्हान नुरभाई युवा मंचचे अध्यक्ष शेख शहानवाज यांनी केले आहे.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणुन घटनेने मान्य केले असले तरी, वास्तविक पाहता मुस्लिम मतदान आपल्या पारड्यात पाडण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करतात. तसेच समाजवादी व धर्मनिरपेक्ष म्हणून गणले जाणारे पक्ष मुस्लीम मतदारांना आपली वोट बँक समजतात. मुस्लीम तरुणांना फसवी आश्वासने देऊन व राजकारण हे करीअर आहे असे भासवून मुस्लीम तरुणांना काही पक्ष व समाजातील प्रस्थापित पुढारी मिसगाईड करीत आहेत. मात्र तरुणांनी कोणत्याही भुलथापानां बळी न पडता शिक्षण, नोकरी किंवा चांगले व्यवसाय निवडुन आनंदाने कुणाची गुलामगिरी न करता स्वाभिमानाने जगावे असे आव्हान शेख शहानवाज यांनी केले आहे.