अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

विमल सेवा प्रतिष्ठान व स्वामी परीवाराकडून जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात सुशोभिकरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठान आणि सचिन स्वामी परिवाराच्या वतीने जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात सुशोभिकरण करण्यात आले.याचा लोकार्पण समारंभ नुकताच झाला.

अंबाजोगाई,परळी व केज पोस्ट ऑफिसचे पोस्ट इन्स्पेक्टर सचिन स्वामी(रा.बोरी) यांनी त्यांचा मुलगा स्वराज याच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्ताने तसेच तालुक्यातील गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात पेव्हर ब्लॉक (फरशी) बसवण्यात आली.हे काम पुर्ण झाल्यामुळे त्याचा लोकार्पण समारंभ सौ.श्रावणी व सचिन स्वामी (रा.बोरी),विमल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पतंगे,पञकार रविंद्र मठपती या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत वृध्द,निराधारांसाठी असणा-या जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमास मदत व सहकार्य करून साजरा करणारे सौ.श्रावणी व सचिन स्वामी (रा.बोरी) हे दांपत्य आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून आदर्श निर्माण करणारे गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठान यांच्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी पञकार रवि मठपती,सौ.श्रावणी व सचिन स्वामी हे मान्यवर लाभले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पतंगे हे होते.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना वसंतराव पतंगे यांनी विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण,पंचक्रोशीतील जनतेची आरोग्य तपासणी शिबीर,ग्राम स्वच्छता अभियान,महिला सक्षमीकरण,गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी समाज उपयोगी,विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती दिली.यावेळी जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर यांनी स्वामी परीवार व विमल सेवा प्रतिष्ठान यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सर्जेराव सावरे यांनी केले.तर प्रवीण पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथअप्पा गिरवलकर,अनंत पवार,आपेट,दत्ता आपेट,भागवत आपेट हे उपस्थित होते.कोवीड 19 पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व सुचनांचे पालन करून कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे सर्व सदस्य व गिरवली येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.