अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शेतकरी संघर्ष संयुक्त मोर्चाचे आंदोलन गेल्या वीस दिवसांपासुन दिल्लीच्या परिसरात लाखोंच्या संख्येने सुरू आहे.शेतकरी विरोधी कायदे व प्रस्तावीत वीज बील रद्द करा या मागणीला पाठींबा म्हणून अंबाजोगाईत सोमवार,दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 12 ते दुपारी 2 या वेळेत लाक्षणिक धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.शहरातील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष संयुक्त मोर्चा (अंबाजोगाई जि.बीड) यांचे वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,स्वतंत्र भारताने प्रजासत्ताक भारताची निर्मिती करून सामान्य व कष्टकरी जनतेचे कल्याण करण्यासाठी काही सार्वजनिक उद्योग उपक्रम देशाची भांडवल गुंतवणुक करून निर्माण केले होते.परंतु,मक्तेदार भांडवलशहांचे दलाल असलेले मोदी सरकार रेल्वे पासुन ते विमानतळा पर्यंत खनिजांच्या खाणी,संरक्षणांच्या दारू गोळ्यांचे कारखाने आणि नवरत्न कंपन्या या अदानी व अंबानी यांना विकुन देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेच्या श्रमात आणि दुःखात जाणीवपुर्वक भर टाकीत आहे.कोरोना महामारीचा फायदा उचलुन सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवुन शेतकरी विरोधी तीन कृषी बिले संसदेत हुकुमशाही पध्दतीने पारीत करण्यात आले ते ताबडतोब रद्द करावेत.तसेच प्रस्तावीत विज बिल मागे घेतले जावे व स्वामीनाथन आयोगाने शेतकरी हितासाठी केलेल्या शिफारशींची आग्रही अमंलबजावणी करावी अशा मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे.धरणे आंदोलन हे सोमवारी सकाळी साडे 11 वाजता सुरू होऊन 1 वाजून 50 मिनिटांस उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी निवेदन स्वीकारले.धरणे आंदोलनाचा समारोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाने झाला.तर प्रारंभी प्रास्ताविक कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर माजी आ.पृथ्वीराज साठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी दिल्ली शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन लढा सतत सुरू राहील याची ग्वाही दिली.लाक्षणीक धरणे आंदोलन करून निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.पृथ्वीराज साठे,भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे कॉ.बब्रुवाहन पोटभरे,बीड जिल्हा सहकारी मजूर संस्थांचा सहकारी संघाचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे,शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, अशोकराव गाढवे,पिंटू कदम,भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे वजीर शेख,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,बहुजन समाज पक्षाचे स.का.पाटेकर,समाजवादी पक्षाचे अॅड.शिवाजी कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रकाश बोरगांवकर,अॅड. इस्माईल गवळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जावेद,काँग्रेसचे नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,नगरसेवक सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,वसंतराव मोरे, संजय वाघमारे,भगवानराव ढगे,फिरोज शेख,अनिल पिंपळे,सुहास चंदनशिव,अजिम जरगर,शेख अकबर, धिरज वाघमारे,प्रशांत मस्के,पुनमसिंग टाक, अमोल धोञे यांचेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे नेते,कार्यकर्ते सहभागी झाले होते.