घोसल्यात निवडणुकी आधीच चुरस वाढली ; सरपंचपद ओ.बी.सी स्री-पुरुष

घोसला:ज्ञानेश्वर पाटील(युवरे)― सरपंचपद ओ.बी.सी स्री-पुरुष गटाकडे गेलेल्या घोसला ग्रामपंचायातीसाठी निवडणुकी आधीच चुरस वाढली आहे.सरपंचपद ओ.बी.सी स्री-पुरुष गटाकडे जाताच गावात राजकीय हालचाली वाढल्या असल्याने निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे.सोयगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या सक्रीय गाव म्हणून घोसल्याची जिल्ह्याशी नाळ जुळली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत राहिलेल्या या गावातील मतदाराने कधीही कौल बदलाविलेला नाही.त्यामुळे तीन वेळा कॉंग्रेसकडून बालेकिल्ला लढविलेल्या विक्रम आप्पा पाटील यांनी घोसला गावाचा विकासाची नांदी चालविली होती त्यांनतर पुन्हा तीनवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बाजी लढविलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गावाचा कारभार सांभाळला त्यानंतर मात्र गावाच्या समीकरणात बदल होत गेला तरीही या निवडणुकीत चुरस वाढणार आहे.सोयगाव तालुक्याला पंचायत समितीचा माजी उपसभापती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रकांत पाटील यांनी गावाचा ठसा तालुक्यावर उमटविला होता.माजी आमदार नितीन पाटील,हर्षवर्धन जाधव,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे यांचे गावाशी जिव्हाळ्याचे नाते असतांना मात्र अचानक निवडणुकी आधी चुरस वाढल्याने या नेत्यांच्या भूमिकेकडे ग्रामाथांचे लक्ष लागून आहे.

मराठा प्रतिष्ठानचे सोपान गव्हांडे यांचे सामाजिक कार्य-

मराठा प्रतिष्ठानचे सोपान गव्हांडे यांनी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावासह तालुक्यात मोठे सामाजिक कार्य हाती घेतले आहे.त्यामुळे गावाच्या राजकीयदृष्ट्या सोपान गव्हांडे यांचाही मोलाचा वाटा असल्याने मात्र सोपान गव्हांडे या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post कोरोना लससाठी १७० कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडे ,सोयगाव तालुक्यात पूर्वतयारी
Next post ‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती