अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत 81 युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.रक्तदान शिबिरासाठी युवा नेते भीमसेन लोमटे व राजवर्धन दौंड यांनी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथे शुक्रवार,दिनांक 18 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात 81 तरूणांनी रक्तदान केले.हे शिबीर आयोजित करण्यासाठी आमदार संजयभाऊ दौंड,राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,माजी आमदार पृथ्वीराज साठे,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांचे मार्गदर्शनाखाली भिमसेन (आप्पा) लोमटे नवाब व राजवर्धन दौंड यांनी पुढाकार घेतला.शिबीराचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,माजी आमदार पृथ्वीराज साठे,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,रणजित चाचा लोमटे,अमर देशमुख, प्रवीण देशमुख,प्रा.प्रशांत जगताप,अजितदादा गरड,अविनाश उगले,काकासाहेब जामदार,रणजित मोरे,अतूल लोमटे, अमीर पठाण,निखिल तौर,अमृतेश्वर जोगदंड,गणेश पटाईत,जयदीप यादव,नरसिंग ढगे,आकाश जगताप,अनिकेत फुलारी,प्रशांत फड,अक्षय कोंडेकर,मनोज केकान यांनी शिबीरास भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भिमसेन अप्पा लोमटे व राजवर्धन दौंड यांनी अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 81 तरूणांनी रक्तदान करून अतिशय चांगला प्रतिसाद दिला.शिबीरात रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे आयोजक भीमसेन लोमटे व राजवर्धन दौंड यांनी आभार मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वाराती शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रूग्णालयात रक्तपेढीचे डॉ.आकाश,शशिकांत पारखे,रमेशराव,रामदासी,राम,अन्वर आणि बालाजी यांचे सहकार्य लाभले.तर रक्तदान शिबिरासाठी भीमसेन आप्पा लोमटे,राजवर्धन दौंड मिञ मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.