अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक व नूतन प्रशासकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव आदित्यदादा पाटील आणि बीड जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा काँग्रेसचे विद्यमान जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते सोमवार, दिनांक 21 डिसेंबर रोजी ह्रद्य सत्कार करण्यात आला.
अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.नवनियुक्त प्रशासक मंडळाकडे अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था अधिकारी यांनी शनिवारी पदभार हस्तांतरीत केल्यानंतर सोमवार,दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी महाविकास आघाडीच्या नवनियुक्त प्रशासक मंडळाचे मुख्यप्रशासक गोविंद बाळासाहेब देशमुख (घाटनांदूर),प्रशासक अमर दगडूसाहेब देशमुख (माकेगाव), विलास दामोदरराव मोरे (बर्दापूर),आबासाहेब अप्पासाहेब पांडे (धानोरा बु.),दत्ताञय लक्ष्मण यादव (तळेगाव घाट) यांचा यशवंतराव चव्हाण चौकातील काँग्रेस नेते राजेसाहेब देशमुख यांचे संपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव आदित्यदादा पाटील आणि बीड जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा काँग्रेसचे विद्यमान जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरूप फेटा,शाल व पुष्पहार असे होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव आदित्यदादा पाटील आणि बीड जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा काँग्रेसचे विद्यमान जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख,युवा नेते राहूल सोनवणे,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हाणमंतराव मोरे,पशुपतीनाथ दांगट,प्रतापराव मोरे,बाळासाहेब जगताप आदींसहीत इतरांची उपस्थिती होती.
सर्वसमावेशक प्रशासकांमुळे शेतकऱ्यांत समाधान
अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतक-यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम करणारी संस्था आहे.समितीचा कार्यकाळ संपला होता परंतू,कोरोना काळात निवडणुकीऐवजी महाविकास आघाडी सरकारने योग्य व अनुभवी प्रशासकांच्या हाती बाजार समितीचा कारभार सोपवला.नूतन प्रशासक हे अनुभवी, कार्यक्षम तसेच शेतकरी,कष्टकरी,श्रमजिवी तसेच व्यापारी बांधवांसह विविध घटकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत.बहुतेक सर्वच प्रशासक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे अशा लोकाभिमुख प्रशासक मंडळाच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख व प्रशासक अमरभैय्या देशमुख यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीचा कारभार गतिमान करण्यासाठी होईल.सर्वसमावेशक प्रशासक मंडळाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय मिळेल असा विश्वास वाटतो.
―राजेसाहेब देशमुख (सदस्य,जिल्हा परिषद,बीड.)