प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोविड १९ लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम

आठवडा विशेष टीम―पुणे जिल्ह्यामध्ये कोविड- १९ चे ( कोरोना) आतापर्यंत ३ लक्ष ६२ हजार ९७९ एवढे बाधित रुग्ण आढळून आले. या अनुषंगाने कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरणाकरीता जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्‍थापन करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या अध्यक्षतेखाली पहिली बैठक 7 डिसेंबर 2020 आणि दुसरी बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्‍यात आली.

कोविड-१९ लसीकरणाचे टप्पे : ( पहिला टप्पा) : सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्था अंतर्गत सर्व कर्मचारी (दुसरा टप्पा) : वयोवृद्ध व कोमॉर्बिड असणारे (तिसरा टप्पा): इतर सर्व सामान्य नागरिक

ड्राय-रन (रंगीत तालीम) : कोविड १९ लसीकरण मोहीम केंद्र शासनाकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याचीच पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) 2 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील ३ आरोग्य संस्‍थांमध्‍ये घेतली जाणार आहे. यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राची हुबेहुब ड्राय-रन (रंगीत तालीम ) घेतली जाईल. यावेळी कोणालाही लस दिली जाणार नाही, असे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

ड्राय रन (रंगीत तालीम) टप्‍पे-

पहिला टप्‍पा – खाली दिलेल्‍या आरोग्‍य संस्‍थांना रंगीत तालमीकरिता लसीकरण सत्राचे ठिकाण म्‍हणून निवडण्‍यात आले आहे.

दुसरा टप्पा : लसीकरण सत्राच्या ठिकाणी ३ खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या वेळी सामाजिक अंतर, मास्क व सॅनीटायझरचा वापर करण्‍यात येणार आहे.

१. प्रतीक्षालय (वेटींग रुम) -या रूम मधील व्‍हेरीफायरकडे लाभार्थ्यांची यादी असेल. त्यामध्ये असणाऱ्या लाभार्थ्यांनाच प्रतीक्षालयात प्रवेश दिला जाईल.

२. लसीकरण कक्ष – येथे लस टोचकाद्वारे लाभार्थ्याला लस देण्यात येईल,

३. निरीक्षण गृह – लसीकरणानंतर लाभार्थ्याला ३० मिनिटे पाहणी करण्याकरिता या रूममध्ये ठेवण्यात येईल.

तिसरा टप्‍पा- लसीकरण सत्राकरिता ५ सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे.

क्र. सदस्य कार्य रूम नं.
गार्ड येणाऱ्या लाभार्थ्यांना सामाजिक अंतर पाळण्यास सांगणार
व्‍हेरीफायर लाभार्थ्याची कोविन पोर्टलवर असलेली माहिती, जसे त्यांचे नाव व आयडी नंबर तपासणार
व्‍हॅक्सिनेटर लाभार्थ्याला लस टोचणार
ऑबझर्व्‍हर लाभार्थ्याला लस दिल्यानंतर लाभार्थ्याची ३० मिनिटे पाहणी करणार
मोबीलायझर लाभार्थ्याला लसीकरणाच्या ठिकाणी बोलवून आणणे व गर्दीचे नियंत्रण करणे

चौथा टप्पा: लाभार्थ्याची कोविन पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याचे नाव, पत्ता, वय, फोन नंबर व आयडी नंबर व्हेरीफायरमार्फत समक्ष पडताळून कोविन पोर्टलवरच लाभार्थ्याला लसीकरणाकरिता पाठवण्यात येईल. तसेच लस दिल्यानंतर लस टोचक कोविन पोर्टलवरच लाभार्थ्याला लस दिल्याचे नोंद करेल. तसेच कोविन पोर्टलच्या मदतीने लाभार्थ्याला लसीकरण सत्राचा दिनांक, ठिकाण, लस याबद्दल माहिती, पुढील डोसचा दिनांक इत्यादीबाबत माहिती लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल.

पाचवा टप्पा : लसीकरणानंतर होणाऱ्या विपरीत परिणामाकरिता पूर्वतयारीची देखील यावेळी रंगीत तालीम घेण्यात येईल. १. प्रत्येक लसीकरण सत्राच्‍या ठिकाणी एक अॅनाफीलॅक्‍सीस कीट उपलब्ध असेल.

२. लसीकरण सत्राच्या जवळचे AEFI Managment Center ओळखून त्याची संपूर्ण माहिती जसे वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव व फोन नंबर यावेळी लसीकरण सत्र ठिकाणी उपलब्ध असेल.

३. प्रत्येक AEFI Managment Center ठिकाणी एक AEFI kit उपलब्ध असेल ,

४. सेंट्रल हेल्‍पलाईन नंबर 104/ 108 वर संपर्क साधून प्रत्यक्षात रुग्णवाहिकेला बोलावून लाभार्थ्याला AEFI Managment Center मध्ये संदर्भित करावयाची ड्राय-रन(रंगीत तालीम) यावेळी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button